संभाजी ब्रिगेडचे कागल तहसीलदारांना निवेदन

कागल (प्रतिनिधी) : महावितरण कडून  वाढीव वीज दर रद्द करा, लॉकडाऊन यांच्या काळात 1 एप्रिल 2020 पासून 20 % वीज दरवाढ करण्यात आली होती. त्यामुळे संपूर्ण देशात  महागडी वीज आपल्या राज्यात आहे. तरी आता आपले नवीन सरकार अस्तित्वात आल्याबरोबर 20 % वीज दरवाढ पुन्हा केली आहे.

तरी आपल्या राज्यात 2. 50 ते 3. 00  रुपयात प्रति युनिट तयार होणारी वीज 12 ते 18 रुपये प्रती युनिट प्रमाणे दर लावून जनतेची खुलेआम लूट होत आहे. त्यामुळे आता या गंभीर मुद्द्यांकडे लक्ष देऊन राज्यात 1जूलै 2022  पासून त्वरित मागे घ्यावी. तसेच राज्यातील जनतेला कमीत कमी दोनशे लिटर पर्यंत मोफत वीज घ्यावी असे निवेदन देण्यात आले. यावेळी नितीन काळबर, नेताजी बुवा, नवीन पाटील, संताजी घोरपडे,  कृष्णात शेंडे, अतुल  खद्रे,   ऋतिक चव्हाण , अरुण जकाते, सुनिल जाघव, नाना बरकाळे, अजित कांबळे, नामदेव गुरव , आदी कार्येकर्ते यावेळी  उपस्थित होते

🤙 9921334545