एसटी बस नदीत कोसळली; १३ ठार

इंदूर : इंदूरहून जळगावमधील अमळनेरकडे येणारी महाराष्ट्र एसटी महामंडळाची बस नर्मदा नदीत कोसळल्याची धक्कादायक घटना मध्यप्रदेशमधील धार जिल्ह्यातील घागरगाव येथे घडली आहे.या अपघातात १३ जणांचा मृत्यू झाला आहे. तर, १२ ते १५ जण बेपत्ता झाले आहेत.

इंदूरहून अमळनेरकडे येणाऱ्या या एसटी बसमधून ४० प्रवासी प्रवास करत होते. बचाव कार्यासाठी एनडीआरएफ व एनडीआरएफचे पथक घटनास्थळी दाखल झाले असून आतापर्यंत सहा जणांना बाहेर काढल्याची माहिती मिळत आहे. मध्य प्रदेशातील धारमध्ये हा भीषण अपघात झाला आहे. इंदूरहून जळगावमधील अमळनेरकडे येणारी एसटी बस नर्मदा नदीत कोसळली. या घटनेची माहिती मिळताच मदत आणि बचाव कार्य सुरू करण्यात आले. अपघातग्रस्त बसला क्रेनच्या मदतीने नदीबाहेर काढण्यात आले आहे.

या घटनेची माहिती मिळाल्यानंतर एसटीचे महामंडळाचे अधिकारीदेखील घटनास्थळी रवाना झाल्याची माहिती एसटी महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने यांनी दिली.

🤙 9921334545