मुंबई: सरपंच आणि नगराध्यक्षांची निवड यापुढे थेट जनतेतून करण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज पत्रकार परिषदेत केली.

मंत्रीमंडळाची बैठक पार पडल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस माध्यमांशी बोलत होते.
भाजप सरकारने २०१८ मध्ये राज्यातील नगराध्यक्ष आणि ग्रामपंचायतीतून सरपंचाची निवड थेट जनतेतून करण्याचा निर्णय घेतला होता. परंतु राज्यात २०१९ मध्ये सत्तांतर झाल्यानंतर महाविकास आघाडी सरकारने पहिल्या अधिवेशनात हा निर्णय बदलला होता. त्यानंतर आज शिंदे – फडणवीस सरकारने महाविकास आघाडीला पुन्हा दणका देत राज्यात यापुढे होणाऱ्या निवडणुकांमध्ये थेट जनतेतून सरपंच व नगराध्यक्षांची निवडणूक होणार असल्याचे जाहीर केले आहे.