ओबीसी आरक्षणाबाबत सर्वोच्च न्यायालयाचे ‘हे’ महत्त्वपूर्ण निर्देश

नवी दिल्ली : महाराष्ट्रातील ओबीसी राजकीय आरक्षण मुद्द्यावर सर्वोच्च न्यायालयाने महत्त्वपूर्ण निर्देश दिले आहे. राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था निवडणकींमध्ये २७ टक्के आरक्षण पुन्हा लागू करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात दाखल असलेल्या प्रलंबित याचिकेवर आज सुनावणी झाली. सुनावणीदरम्यान न्यायालयाने सांगितले की, या प्रकरणाबाबत पुढील सुनावणी १९ जुलै रोजी पार पडेल.

महाराष्ट्रातील ओबीसी राजकीय आरक्षण मुद्द्यावर सर्वोच्च न्यायालयाने महत्त्वपूर्ण निर्देश दिले आहे. राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था निवडणकींमध्ये २७ टक्के आरक्षण पुन्हा लागू करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात दाखल असलेल्या प्रलंबित याचिकेवर आज सुनावणी झाली. सुनावणीदरम्यान न्यायालयाने सांगितले की, या प्रकरणाबाबत पुढील सुनावणी १९ जुलै रोजी पार पडेल. तत्पूर्वी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी नवीन अधिसूचना काढण्यात येऊ नये. तसेच राज्यात आतापर्यंत जाहीर झालेल्या निवडणुकांच्या अधिसूचनेत कोणताही बदल करू नये असेही न्यायालयाने म्हटले आहे. म्हणजेच राज्यात ज्या निवडणुका जाहीर झाल्या आहेत त्या आता ओबीसी आरक्षणाशिवायच पार पडतील हे नक्की. राज्यात सुमारे ९२ नगरपरिषदांच्या निवडणुका वेळेत आणि ओबीसी आरक्षणाशिवाय पार पडतील हे आता स्पष्ट झाले आहे.