विजय मल्ल्याला चार महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा

नवी दिल्ली : विजय मल्ल्या याला न्यायालयाचा अवमान केल्याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने ४ महिन्यांच्या तुरुंगवास आणि २००० रुपयांचा दंड ठोठावला आहे. २०१७ मध्ये न्यायालयाचा अवमान केल्याबद्दल तो दोषी ठरला होता. त्यावर आज न्यायमूर्ती यूयू ललित यांच्या अध्यक्षतेखाली रविंद्र एस भट आणि पी एम नरसिंह यांच्या खंडपीठाने निकाल दिला. खंडपीठाने १० मार्च रोजी आपला निकाल राखून ठेवला होता.

९ मे २०१७ रोजी सर्वोच्च न्यायालयाने मल्ल्याला न्यायालयाचा अवमान केल्याप्रकरणी दोषी ठरवले होते. कारण त्याने मालमत्तेची संपूर्ण माहिती दिलेली नव्हती. तसेच न्यायालयाने या निर्णयावर पुनर्विचार करण्यासाठी मल्ल्याच्या बाजूने पुनर्रिक्षण याचिका २०२० मध्ये रद्द केली होती. न्यायालयाने आपल्या आदेशांचा दाखला देत आपल्या मुलांच्या बँक खात्यात चार कोटी डॉलर ट्रान्सफर करणे हा न्यायालयाचा अपमान असल्याचे सांगितले होते. कारण मल्ल्या न्यायालयाच्या परवानगीशिवाय कोणताही व्यवहार करू शकत नाहीत, असे कर्नाटक उच्च न्यायालयाने त्यावेळी आपल्या आदेशात म्हटले होते.

🤙 9921334545