‘कोजिमाशि’त सत्तारूढ स्वाभिमानी आघाडी पुढे

कोल्हापूर (प्रतिनिधी) : आरोप-प्रत्यारोपाने गाजलेल्या कोल्हापूर जिल्हा माध्यमिक शिक्षण सेवक सहकारी पतसंस्थेच्या निवडणुकीत सत्तारूढ स्वाभिमानी सहकार आघाडीचे सर्वसाधारण गटातील १६ उमेदवार आघाडीवर आहेत. हे सर्व उमेदवार ४०० ते ७०० मतांनी आघाडीवर आहेत.

(कोशिमाशि) निवडणुकीसाठी काल (शनिवारी) चुरशीने ९५.७ टक्के मतदान झाले. २१ जागांसाठी ४७ उमेदवार रिंगणात आहेत. सत्ताधारी आघाडीच्या उमेदवारांची विजयाच्या दिशेने वाटचाल सुरु आहे. निवडणुकीचा निकाल जाहीर होईल, तसा सत्ताधारी गटाच्या समर्थक तसेच कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण, फटाक्यांची आतिषबाजी करत जल्लोष सुरू केला आहे.

🤙 9921334545