मुंबई : एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. तर माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेत शिंदे सरकारने विश्वासदर्शक ठरावदेखील जिंकला. या सत्ता स्थापनेबाबत शिवसेनेने आक्षेप घेत पुन्हा एकदा सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.

शिवसेनेकडून बंडखोरी केलेल्या १६ आमदारांविरोधात याअगोदर कारवाई करण्यात आली. त्यांना अपात्र ठरविण्यात आले. याविरोधात शिंदे गटाने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. यावर न्यायालयाने 11 जुलैपर्यंत जैसे थी स्थिती ठेवण्यास सांगितले.
त्यानंतर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी शिंदे गट) आणि भाजपला सरकार स्थापन करण्याची संधी दिली होती. शिंदे आणि फडणवीस यांनी त्यानंतर राजभवनात शपथ घेतली. आता शिंदे सरकार विरोधात याचिका दाखल करण्यात आली आहे. राज्यातील सत्ता स्थापनेवर शिवसेनेने आक्षेप नोंदवला आहे. शिवसेनेने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. विधिमंडळ सभागृह बेकायदा पद्धतीने चालवले, विधानसभा अध्यक्षांची नियुक्ती बेकायदा आहे, राज्यपालांची भूमिकादेखील बेकायदा आहे, असा आक्षेप घेण्यात आला आहे.