मी पुन्हा आलो आहे… मी ‘त्याचा’ बदला घेणार…

मुंबई : २०१९ ला ‘मी पुन्हा येईन’ असं वक्तव्य केलं होत. माझ्या त्या वक्तव्याची प्रचंड टिंगल उडवण्यात आली. मी आता परत आलो आहे. मी पुन्हा आलो आहे आणि या सगळ्यांना घेऊन आलोय, असा टोला देवेंद्र फडणवीस यांनी लगावला. मी याचा बदला घेणार होतो आणि या सर्वांना माफ करून मी माझा बदला घेतला आहे, असंही फडणवीसांनी सांगितलं.

फडणवीस म्हणाले, मविआचे सरकार आले, तेव्हा मी म्हणत होतो, हे सरकार अनैसर्गिक आहे. तेव्हा मी एक कविता म्हटली होती. त्यातून ‘मी पुन्हा येईन असे म्हटले होते, त्यावर माझी खूप टिंगलटवाळी केली. पण मी आता पुन्हा आलो आहे आणि एकटा नाही आलो तर सगळ्यांना घेऊन आलो आहे. मी सगळ्यांचा आता बदला घेणार आणि बदला आहे की मी त्यांना माफ केले आहे. राजकारणामध्ये अशा गोष्टी मनावर घ्यायच्या नसतात. प्रत्येकाचा मौका येत येत असतो. ‘दुनिया में सारे शोक पाले नही जाते, काच के खिलोने हवा में उछाले नही, जाते सारे काम तक्कदीर भरसे टाले नही जाते’ अशी शायरी म्हणत फडणवीसांनी विरोधकांना जोरदार टोला लगावला.

ते पुढे म्हणाले की, आम्ही विरोधी बाकावर होतो पण कधी विचलित झालो नाही. कोरोनाच्या काळातही जनतेमध्ये राहिलो. काही लोक हे आम्हाला म्हणतात की सत्तेसाठी आम्ही आहोत. पण, सामाजिक काम करण्यासाठी सत्ता हवी आहे. पर्यायी सरकार देणार असे म्हटलो होतो. आता नरेंद्र मोदी यांनी ते दाखवून दिले आहे. ज्या पक्षाने मला सर्वोच्च अधिकार दिले, आज त्यांनी मला उपमुख्यमंत्रिपदावर बसण्याचे आदेश दिले मी ते स्विकारले. आज मी शिंदे यांच्या पाठीशी ठामपणे उभा आहे, असेही फडणवीस यांनी यावेळी सांगितले.

🤙 9921334545