सभासदांचा कौल मान्य : प्रसाद पाटील

कोल्हापूर : प्राथमिक शिक्षक बँकेच्या निवडणुकीत आम्ही एका वैचारिक भूमिकेतून लढत दिली. सभासदांच्या आर्थिक नुकसानीविरोधात आणि सभासद हितासाठी आम्ही केलेला संघर्ष, बँक वाचवण्यासाठी दिलेला लढा व आमचे संघटनात्मक कार्य सर्व सभासदांपर्यंत पोहोचवण्यात आम्ही यशस्वी झालो पण सभासदांनी का नाकारले हे कळले नाही, सभासदांनी दिलेला कौल मान्य आहे, अशी प्रतिक्रिया ‘आप’लं पुरोगामी- समविचारी परिवर्तन पॅनेलचे प्रमुख, पुरोगामी शिक्षक संघटनेचे राज्याध्यक्ष प्रसाद पाटील यांनी दिली.

 प्रसाद पाटील म्हणाले, सत्ताधारी मंडळींनीं केलेला चुकीचा कारभार आम्ही पोहोचवण्यात यशस्वी झालो. पण लाभ दुसऱ्यालाच झाला. सभासदांनी दिलेला कौल आम्हाला मान्य असून उद्यापासून आमचे संघटनात्मक कार्य सुरूच राहणार आहे. काय जिंकले माहित नाही पण वैचारिक लढा, सभासद हितासाठी केलेला २० वर्षे संघर्ष आणि निस्वार्थी भावनेने केलेले संघटनात्मक कार्य हरले याची खंत मनात कायम राहील. विजयी झालेल्या सर्व नुतन संचालकांनी सभासद हिताचा व बँक हिताचा कारभार करावा, यासाठी सर्व नुतन संचालकांना हार्दिक शुभेच्छा.