कोल्हापूर: विद्यार्थ्यांना विज्ञान शाखेत करिअरचे अनेक मार्ग खुले आहेत, असे प्रतिपादन प्रा. तुकाराम डोंगळे यांनी केले.

मानव हायस्कूल शेंडूर येथे 10 वी व 12 वी पास विद्यार्थ्यांसाठी करिअर मार्गदर्शन आयोजित केले होते. यावेळी ते बोलत होते.
शिवाजी विद्यापीठ येथे इलेक्ट्रॉनिक विभागात संशोधक म्हणून कार्यरत असलेले प्रा. तुकाराम डोंगळे यांनी विज्ञान शाखेतील पदवीमध्ये करिअरचे अनेक मार्ग आहेत. याविषयी अतिशय अभ्यासपूर्ण व प्रेरणादायी मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमात प्रा. किशोर जगधाने व प्रा. संतोष सुतार यांनीही करिअर मार्गदर्शन केले. मुख्याध्यापक टी. व्ही. कुंभार यांनी प्रास्ताविक केले.
यावेळी महादेव गुरव, युवराज तिरुके, प्रभाकर गवंडी, हरी वडगावकर, सुरेश कांबळे,सागर लाटकर व सर्व शिक्षक स्टाफ उपस्थित होते. आभार संजय रामाने यांनी मानले.