राजकीय गोंधळामुळं अधिकाऱ्यांवर ‘डोकं’ धरण्याची वेळ !

मुंबई : राज्यातील राजकीय अस्थिरतेमुळे बदल्यांसाठी वेटींगवर असणारे अधिकारी हायटेंशनवर आहेत. राज्यातील महाविकास आघाडीतील मंत्री देखील अस्वस्थ आहेत.

मुख्यमंत्री कार्यालय येथे अधिकाऱ्यांच्या बदल्यांच्या फाईल्स पडून असून त्याबाबत अद्याप कार्यालयाने कोणताही निर्णय घेतला नाही अशी माहिती सूत्रांनी दिली. वरिष्ठ सचिव तसेच सनदी अधिकाऱ्यांकडून सध्याच्या राजकीय परिस्थितीत कोणीही दबाव टाकला तरी गैरकारभार होता कामा नये, अशा सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिल्या आहेत. मुख्यमंत्र्यांच्या सूचनेमुळे प्रशासकीय अधिकारी सावध भूमिका घेत काम करत आहेत.

विशेष म्हणजे काही मंत्र्यांनी सीएम ठाकरे यांना विनंती केली सीएम कार्यालय बदल्या आणि इतर महत्वाचा फाईल निर्णय घ्यावा पण सीएम अद्याप त्यावर निर्णय घेत नाही. यामुळे काही कॅबिनेट मंत्री अस्वस्थ झाले.वास्तविक 30 मे पर्यत सर्व प्रशासकीय बदल्या होणे अपेक्षित होते, पण सीएम ठाकरे यांनी नियमित प्रशासकीय बदल्या 30 जूनपर्यत कराव्या, असा शासकीय आदेश काढला.त्यानंतर सगळ्या बदल्या थांबविल्या गेल्या. आता राजकीय अस्थिरता पाहता तात्काळ याबाबत निर्णय घ्यावा असा दबाव सीएम ठाकरे यावर महाविकास आघाडीत मंत्री करत आहे. अशी माहिती ही सूत्रांनी दिली.