राजर्षी शाहू स्वाभिमानी शिक्षक आघाडीचा राधानगरी तालुक्यातून प्रचार शुभारंभ

राधानगरी (प्रतिनिधी) : जुन्यांचा अनुभव आणि नव्या नेतृत्वाची कल्पकता आणि जोश यांच्या मिलाफातून राजर्षी शाहू स्वाभिमानी शिक्षक आघाडी निश्चितपणे विजय होईल, असा विश्वास राजर्षी शाहू पॅनलचे सुकाणू समितीचे सदस्य ज्योतीराम पाटील यांनी व्यक्त केला.

    राधानगरी तालुक्यातील तुरंबे येथे राजर्षी शाहू स्वाभिमानी शिक्षक पॅनलच्या राधानगरी तालुका सर्वसाधारण गटाचे उमेदवार राजेंद्रकुमार लहू पाटील यांच्या प्रचार शुभारंभप्रसंगी ते बोलत होते. या प्रचार शुभारंभ दौऱ्याची सुरुवात कसबा तारळे येथील विठ्ठलाई मंदिर येथून करण्यात आली.

यावेळी शिक्षक समितीचे सरचिटणीस प्रमोद तौंदकर यांनी अनावश्यक खर्च टाळून काटकसरीने बँकेचा कारभार केला जाईल. सभासदांच्या हिताला प्राधान्य दिले जाईल. एक अंकी कर्जाचा व्याजदर व दोन अंकी डिव्हीडंट देणारच, असे सांगितले.

त्यानंतर राधानगरी तालुक्यातील सर्व शिक्षक आकनूर येथील चाळकेश्वर मंदिर मार्गे तुरंबे येथील गणपती मंदिर सभागृहांमध्ये एकत्र झाले. याठिकाणी प्रचाराची शुभारंभ सभा संपन्न झाली. या सभेच्या ठिकाणी कागलचे सर्वसाधारण गटाचे उमेदवार बाळासाहेब निंबाळकर व भुदरगड सर्वसाधारण गटाचे उमेदवार बाळकृष्ण हळदकर यांनी उपस्थित राहुन पॅनेलला प्रचंड मतांनी विजयी करण्याचे आवाहन केले.

कसबा तारळे येथे पार पडलेल्या सभेच्या निमित्ताने मागासवर्गीय संघटनेचे राज्य नेते जीवन कांबळे यांनी सभेला मार्गदर्शन केले. आकनूर मध्ये पार पडलेल्या सभेला शिक्षक समितीचे तालुकाध्यक्ष बाळासो पवार यांनी मार्गदर्शन केले. तर तुरंबे येथे पार पडलेल्या सभेला पॅनलचे सुकाणु समिती सदस्य ज्योतीराम पाटील यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिक्षक नेते बंडोपंत किरूळकर होते. यावेळी सुकानु समिती सदस्य प्रमोद तौंदकर, बाळासो पोवार पॅनलचे उमेदवार राजेंद्रकुमार पाटील, बाळासाहेब पोवार यांनी मनोगते व्यक्त केली.    

यावेळी गणपती गुंडू पाटील, दिनकर आण्‍णासो पोवार, पांडुरंग खेबुडकर, मधुकर भोई, दिनकर भोई, पांडुरंग अण्णासो पाटील, विलासराव चौगले, भुदरगड तालुका शिक्षक संघाचे नेते आनंदराव जाधव, राधानगरी शिक्षक संघाचे नेते संभाजीराव पाटील, शिक्षक संघाचे तालुकाध्यक्ष भीमराव रेपे, कुंडलिक हातकर, कास्ट्राईब संघटनेचे तुकाराम संघवी, राजू कांबळे, शिक्षक भारतीचे तालुकाध्यक्ष राजेंद्र मिटके, जिल्हा संघटक विजय पाटील, पी. के. पाटील, रवींद्र बोडके, शाहू चौगले, संजय जांगनुरे, शिवाजीराव पाटील, उत्तम फराकटे, प्रमोद भांदीगरे, संजय बरगे, नारायण आयरे, अशोक मोरे, भाऊ टिपुगडे, तानाजी पाटील, आनंदराव रेवडेकर, श्रीकांत कलीकते, अशोक साबळे, शिक्षक पतसंस्थेचे चेअरमन अशोक वागरे, व्हाईस चेअरमन शिवाजी झाटे,  शिक्षक समितीचे तालुका सरचिटणीस प्रकाश कांकेकर, मधुकर मुसळे, रघुनाथ कर्णिक यांच्यासह तालुक्यातील सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते. आभार संजय जितकर यांनी मानले.