मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनाही कोरोनाची लागण

मुंबई : राज्यात राजकीय सत्तासंघर्ष सुरु असतानाच राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना आज सकाळी कोरोनाची लागण झाल्याचं वृत्त समोर आलेलं असताना आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनाही कोरोनाची लागण झाली आहे. मंत्रिमंडळ बैठकीत ते व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे सहभागी होणार आहेत.

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी उद्धव ठाकरे यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती दिली आहे. उद्धव ठाकरे यांना जरी कोरोनाची लागण झाली असली तरी त्यांची प्रकृती ठीक आहे. काँग्रेस नेते कमलनाथ यांच्याशी त्यांचं बोलणं झालं आहे, अशी माहितीही नाना पटोले यांनी दिली.