मुंबई : विधान परिषदेच्या निवडणुकीत काँग्रेसचा एक उमेदवार पराभूत झाल्याने त्याची जबाबदारी स्वीकारत मंत्री बाळासाहेब थोरात यांनी काँग्रेसच्या विधिमंडळ गटनेतेपदाचा राजीनामा दिला आहे.

बाळासाहेब थोरात यांनी म्हटले की, “या पराभवाची जबाबदारी मी घेतो” काँग्रेसच्या पहिल्या पसंतीचे उमेदवार चंद्रकांत हंडोरे यांचा पराभूत झाला आहे. त्यानंतर काँग्रेसमध्ये अंतर्गत नाराजी पाहायला मिळत आहे. काँग्रेसला ४४ पैकी ४१ मते मिळाली आहेत. म्हणजे काँग्रेसचे ३ मते फुटली आहेत. सोमवारी निवडणुकीचा कल हाती येताच बाळासाहेब थोरात यांनी पराभव पत्कारत “आमच्या पक्षाची मते फुटली इतरांना काय दोष घ्यायचा” असे म्हटले होते. त्यानंतर आता थोरात विधिमंडळ गटनेतेपदाचा राजीनामा दिला आहे.
