गारगोटी : कृषी विभागाच्यावतीने घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय भात पीक स्पर्धेत युवा ग्रामीण पतसंस्था गारगोटीचे संचालक कृष्णात जरग (रा. म्हसवे) यांचा तृतीय क्रमांक आला. यानिमित्त संस्थेच्यावतीने त्यांचा आमदार प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

कृषी उत्पादनामध्ये भर घालण्यासाठी शेतकऱ्यांचे योगदान मिळेल. तसेच त्यांचे मार्गदर्शन परिसरातील इतर शेतकऱ्यांना होऊन राज्याच्या एकूण उत्पादनात मोलाची भर पडेल. या उद्देशाने राज्यात कृषि विभागामार्फत पीक स्पर्धा योजना राबविण्यात येत आहे. या स्पर्धेमध्ये म्हसवे (ता. भुदरगड) येथील प्रगतशिल शेतकरी कृष्णात जरग यांचा तृतीय क्रमांक आला. याबद्दल त्यांचा राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या हस्ते व उपमुख्यमंत्री अजित पवार आणि महसुल मंत्री बाळासाहेब थोरात, छगन भुजबळ, संदीपान भुमरे, विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, राज्यमंत्री विश्वजित कदम आदी प्रमुख मान्यवरांच्या उपस्थित सत्कार करण्यात आला. त्यांच्या याउल्लेखनिय कामाबद्दल युवा ग्रामीण पतसंस्थेच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला.