पंतप्रधानांना ‘माफीवर’ बनावे लागेल; राहुल गांधींचा हल्लाबोल

नवी दिल्ली : पंतप्रधानांना काळे कृषी कायदे परत घ्यावे लागले, त्याच पद्धतीने त्यांना ‘माफीवीर’ होऊन देशातील तरुणांची मागणी मान्य करावी लागेल आणि ‘अग्निपथ’ परत घ्यावे लागेल’ असा हल्लाबोल काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी केला आहे. राहुल गांधी यांनी याबाबत एक ट्विट केलं आहे.

राहुल गांधी म्हणाले, ज्या प्रकारे कृषीविषयक कायदे मागे घेण्यात आले त्याचप्रमाणे अग्निपथ योजनाही मागे घ्यावी लागेल. दरम्यान, खासदार राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची खिल्ली उडवत म्हटले की, पंतप्रधानांना देशातील तरुणांची माफी मागावी लागेल, गेल्या वर्षी शेतकऱ्यांची माफी मागितल्यानंतर दुसऱ्यांदा तीन कृषी कायदे मागे घेण्यात आले होते. सलग आठ वर्षे भाजप सरकारने ‘जय जवान, जय किसान’च्या मूल्यांचा अपमान केला आहे. मी पूर्वीच सांगितले होते की पंतप्रधानांना तीन कृषी कायदे मागे घ्यावे लागतील. त्याचपद्धतीने त्यांना ‘माफीवर’ बनून देशातील तरूणांचे म्हणणे ऐकावे लागेल आणि ‘अग्निपथ’ला मागे घ्यावे लागेल.