राष्ट्रपतीपदाची निवडणूक जाहीर

नवी दिल्ली : भारतीय निवडणूक आयोगाने राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीची तारीख जाहीर केली आहे. राष्ट्रपती निवडणुकीसाठी १८ जुलै रोजी मतदान आणि २१ जुलै रोजी मतमोजणी होणार असल्याचे मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी आज जाहिर केले.

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचा कार्यकाल २४ जुलै २०२२ दिवशी संपणार आहे. त्यानंतर निवडणूक बिनविरोध न झाल्यास नवा राष्ट्रपती निवडण्यासाठी १८ जुलै दिवशी निवडणूक होणार आहे तर २१ जुलैला मतमोजणी होईल अशी माहिती आज निवडणूक आयोगाकडून देण्यात आली आहे. १५ जुलैला अधिसूचना जारी केली जाईल. यासह नावनोंदणीची प्रक्रिया सुरू होईल. नावनोंदणीसाठी सुमारे दोन आठवडे दिले जातील. नामनिर्देशन प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी उमेदवारी अर्जांची छाननी होणार आहे. त्यानंतर उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी २ ते ३ दिवसांचा अवधी देण्यात येणार आहे. मतदानानंतर २ ते ३ दिवसांनी मतमोजणी होणार आहे. ही संपूर्ण प्रक्रिया २० जुलैपर्यंत पूर्ण होण्याची शक्यता आहे. विद्यमान राष्ट्रपती रामनाथ यांचा कार्यकाळ २५ जुलै रोजी संपत आहे. २५ जुलै रोजी सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश नवीन राष्ट्रपतींना शपथ देतील.

राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत देशातील विधानसभा, राज्यसभा आणि लोकसभेतील सदस्य मतदान करतात. अपवाद केवळ राज्यात राज्यपाल नियुक्त आणि संसदेतील (राज्यसभा) राष्ट्रपती नियुक्त सदस्य या पदासाठी मतदान करु शकत नाहीत. राष्ट्रपती पदासाठीच्या निवडणुकीसाठी गुप्त मतदान पद्धती अवलंबली जाते. या निवडणुकीत कोणत्याही पक्षाला मतदानासाठी व्हीप बजावता येत नाही. म्हणजेच कोणताही मतदार त्याच्या पसंतीच्या कोणत्याही उमेदवाराला मतदान करु शकतो. मतदानाची प्रक्रियाही विशिष्ट पदधतीची असते. जी इतर निवडणुकीपेक्षा काहीशी वेगळी ठरते.

🤙 9921334545