मुंबई (प्रतिनिधी) : राज्याचे माजी मुख्यमंत्री, भाजपचे नेते आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना पुन्हा एकदा कोरोनाची लागण झाली आहे. कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आल्याची माहिती फडणवीसांनी स्वतः ट्विट करुन दिली आहे.
फडणवीस करोनाणाची लागण झाल्याने देवेंद्र फडणवीस यांचा सोलापूर दौरा रद्द करण्यात आला. दरम्यान, माझ्या संपर्कात आलेल्यांनी स्वतःची चाचणी करुन घ्यावी. सर्वांनी स्वतःची काळजी घ्यावी, असे ट्विट देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे. फडणवीस डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार सगळी औषधे घेत आहेत. ते सध्या घरीच आयसोलेशनमध्ये आहेत.