‘या’ शिवसेना नेत्याच्या गाडीला अपघात

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्याचे माजी जलसंधारण मंत्री आणि शिवसेनेचे आमदार तानाजी सावंत यांच्या गाडीला सोलापूर-पुणे महामार्गावरली वरवंड येथे अपघात झाला. उस्मानाबाद येथील शिवसेना मेळावा संपल्यानंतर ते पुण्याकडे जात असताना हा अपघात झाला. या अपघातात कारचे किरकोळ नुकसान झाले आहे.

सावंत हे संपर्क अभियान टप्पा दोनसाठी दोन दिवस भुम, परंडा, वाशी व उस्मानाबाद दौऱ्यावर होते. उस्मानाबाद येथील शिवसंपर्क अभियान संपवून ते पुण्याकडे निघाले होते. सोलापूर पुणे महामार्गावर वरवंड येथे आल्यांनतर त्यांच्या गाडीचा अपघात झाला. रात्रीच्या सुमारास हा अपघात झाला. अपघाताचे नेमके कारण कळू शकले नाही. सुदैवाने सावंत या अपघात थोडक्यात बचावल्याने सगळ्यांनी सुटकेचा निश्वास सोडला.