राज्यात पुन्हा मास्कची सक्ती

मुंबई : कोरोनाची संख्या वाढू लागल्याने राज्यात गर्दीच्या ठिकाणी मास्क लावणं आता बंधनकारक असणार आहे. आरोग्य विभागाने एक पत्र जारी केलं असून आरोग्य विभागाच्या सूचनेनुसार रेल्वे, बस, सिनेमागृह, सभागृह, रुग्णालय, कॉलेज, शाळा इत्यादी ठिकाणी मास्क सक्ती असणार आहे.

कोरोना रुग्णांचा आकडा पुन्हा एकदा वाढू लागलाय. काल राज्यभरात ११३४ रूग्ण आढळले होते. यानंतर पुन्हा राज्यात गर्दीच्या ठिकाणी मास्क वापरणं गर्दीच्या ठिकाणी राज्यात मास्क लावणं आता बंधनकारक असणार आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शाळा, कॉलेज, रेल्वे, सिनेमागृह अशा गर्दीच्या ठिकाणी मास्क बंधनकारक असणार आहे. एकंदरीत कोरोनाचे रूग्ण वाढत असल्याने मास्कसक्तीचा निर्णय घेण्यात आला आहे.राज्याचे आरोग्य सचिव प्रदीप व्यास यांनी राज्यातील जिल्हाधिकाऱ्यांना पत्र लिहिलंय. या पत्रामध्ये राज्यात गर्दीच्या ठिकाणी मास्क बंधनकारक असल्याच्या सूचना करण्यात आल्या आहे. यामध्ये रेल्वे, बसेस तसंच सिनेमागृह अशा गर्दीच्या ठिकाणी मास्क लावणं बंधकारक असल्याचं म्हटलं आहे.

दरम्यान, देशात कोरोनाचं वाढतं प्रमाण पाहता केंद्र सरकार सतर्क झालंय. केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी शुक्रवारी पाच राज्यांना पत्र लिहिलं होतं. यामध्ये तामिळनाडू, केरळ, तेलंगणा, कर्नाटक आणि महाराष्ट्राचा समावेश आहे.