आमचं ठरलयं, गुलाल लावायचा फक्त उरलयं ! धन्वंतरी पतसंस्था निवडणुकीत महालक्ष्मी पँनेलचा जाहीरनामा जाहीर      

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर जिल्हा आरोग्य कर्मचारी-अधिकारी धन्वंतरी सेवक सहकारी पत संस्थेंच्या निवडणुकीला आता केवळ एक दिवसच उरला आहे.  या निवडणुकीत महालक्ष्मी सत्तारूढ पँनेलने प्रचारात जोरदार मुसंडी मारली आहे. या पँनेलने आपला जाहीरनामा नुकताच प्रसिद्ध केला आहे. या जाहीरनाम्यातील आमचं ठरलयं , गुलाल लावायचा फक्त उरलयं ! हे वाक्य चांगलचं आकर्षक ठरलयं.  

या जाहीरनाम्यात संस्थेचे कर्जावरील व्याजदर ९ टक्के करणे, सभासदांच्या पाल्यांना एम.पी.एस.सी.-यु.पी.एस.सी. या स्पर्धा परीक्षांसाठी मार्गदर्शन शिबीर आयोजित करणे, जिल्हा परिषद सोसायटीच्या पध्दतीने सभासदांना चांगल्या योजना राबविणे, सभासदाच्या पाल्यांना वैद्यकीय शिक्षणासाठी विशेष योजना राबवणे, वैद्यकीय उपचारासाठी कँसलेस विमा योजना राबविणे असा  हा जाहीरनामा प्रसिद्ध  करण्यात आला आहे. पँनेलचे नेते एम.एम.पाटील, डॉ.असिफ सौदागर तसेच उमेदवारांच्या उपस्थितीत हा जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला.