कोल्हापूर : शरीर तंदुरुस्त आणि आपल्या जीवनातील आरोग्यविषयक समस्या कमी करण्यासाठी नियमितपणे सायकल चालवणे हाच चांगला पर्याय आहे. सायकल चालवा आणि जीवनात निरोगी-आनंदी राहा, अशा शब्दांत कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाचे चेअरमन विश्वास पाटील यांनी तंदुरुस्त जीवनासाठी टिप्स दिल्या.
निमित्त होते, ‘तीन जून, जागतिक सायकल दिनाचे !’. कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ (गोकुळ) व कोल्हापूर सायकल क्लब यांच्यावतीने शुक्रवारी ३ जूनला कोल्हापुरात सायकल रॅलीचे आयोजन केले होते. गोकुळ दूध संघाचे चेअरमन विश्वास पाटील यांच्या हस्ते व संचालक अजित नरके, कोल्हापूरच्या पहिल्या महिला आयर्न मॅन माहेश्वरी सरनोबत व कोल्हापूर साईकल क्लबचे अध्यक्ष अनिल शिंदे यांच्या उपस्थितीत दसरा चौक येथे रॅलीचे उद्घाटन झाले.
अतिशय उत्साही वातावरणात दसरा चौक येथून रॅलीस सुरुवात झाली. दसरा चौक, हॉकी स्टेडियम, शेंडापार्क, शांतीनिकेतन, कावळा नाका ते गोकुळ संघाच्या ताराबाई पार्क कार्यालय या मार्गाने सायलक रॅली निघाली. या सायकल रॅलीत जवळपास २०० सायकलपटूनी सहभाग घेतला. ताराबाई पार्क येथील गोकुळ कार्यालय येथे सर्व सायकलपटूंचे स्वागत करण्यात आले. सर्व स्पर्धकांना संघामार्फत चेअरमन विश्वास पाटील यांच्या हस्ते व मान्यवरांच्या उपस्थिती प्रमाणपत्र देण्यात आली. संचालक अजित नरके, माहेश्वरी सरनोबत, कोल्हापूर सायकल क्लबचे संदीप मगदूम यांनी मार्गदर्शन केले. एम. पी. पाटील यांनी सूत्रसंचालन केले.
अनिल शिंदे, सूरज मोहिते, सुजय जाधव, राजेश बाभुळकर, सुभाष माने, रुपेश चौगले, अतुल शिंदे, अर्जुन पाटील, रोहन पवार, ओंकार खाडे, विष्णु खडके, राजेश बुवा, अभय पेडणेकर, बोर्ड सेक्रेटरी एस. एम. पाटील, डेअरी व्यवस्थापक अनिल चौधरी, मार्केटिंग व्यवस्थापक हणमंत पाटील, आस्थापना व्यवस्थापक डी. के. पाटील उपस्थित होते.