नवी दिल्ली : काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांनाही कोरोनाची लागण झाली आहे. काल गुरुवारी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी कोरोना पॉझिटिव्ह आल्या होत्या. त्यानंतर प्रियांका गांधी यांनी आज शुक्रवारी ट्विट केले की, मलाही कोविडची लागण झाली आहे.
लखनऊ दौरा आटोपून प्रियांका गांधी बुधवारी दिल्लीत परतल्या. त्यांनी आई सोनिया गांधी यांची भेट घेतली होती, त्यानंतर त्यांनाही कोरोनाची लागण झाल्याचे आढळून आले. प्रियांका यांनी त्यांच्या संपर्कात आलेल्या सर्व लोकांना कोरोना चाचणी करण्याचे आवाहन केले आहे. सोनिया गांधी यांना बुधवारी संध्याकाळी सौम्य ताप आला होता. त्यानंतर केलेल्या कोविड चाचणीत त्या पॉझिटिव्ह आढळल्या. त्यानंतर आता प्रियांका गांधी यादेखील कोरोनाबाधित झाल्या आहेत.