कोल्हापूर (प्रतिनिधी) : महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ ललीत कला भवन राजारामपूरी कोल्हापूर यांच्या वतीने क्रिडाई कोल्हापूर सीपीआर हॉस्पीटल व लोटस मेडीकल फौंडेशन कोल्हापूर यांच्या सहकार्याने इमारत व इतर बांधकाम कामगार यांचेकरीता सर्वरोग निदान शिबीराचे आयोजन हिराश्री लेक सिटी अंबाई टँकजवळ कोल्हापूर येथे करण्यात आले होते.
शिबीराचे उदघाटन बांधकाम व्यावसायिक कृष्णात पाटील यांच्या हस्ते तर संदीप मिरजकर कामगार कल्याण समिती क्रिडाई अमित गायकवाड, संदीप पोवार योगेश आठल्ये यांच्या प्रमुखवैद्यकीय अधिकारी डॉ ओवी तोरस्कर डॉ सतिश चौगुले सीपीआर हॉस्पीटलच्या मंगल माने, लोटस मेडीकल फौंडेशनचे अमित गायकवाड यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडले
नेहमी दुर्लक्षित राहिलेला बांधकाम कामगारांना केंद्रीत करून मंडळाने सुरु केलेला हा उपक्रम स्तुत्य आहे. आपल्या आरोग्याबाबत बांधकाम कामगार फारसा जागृत असत नाही अशा कामगाराची साईट वर जाऊन वैद्यकीय तपासणी व आवश्यक रक्त तपासणी शासनाकडून होणे कौतुकास्पद आहे असे मत बांधकाम व्यावसायिक कृष्णात पाटील यांनी मांडले.
क्रिडाई कोल्हापूर संस्थेचा कामगार कल्याण समितीची जबाबदारी पार पाडताना मंडळाच्या कल्याणकारी उपक्रमांना आवश्यक सहकार्य करण्याची भुमिका क्रिडाई मार्फत घेतली जाईल स्वतःच्या आरोग्याबाबत दक्षता न घेणारा बांधकाम कामगारांमध्ये आरोग्या बाबत जनजागृतीची मोहिम राबविताना क्रिडाई नेहमी सक्रीय राहील असे मत क्रिडाईचे संदीप मिरजकर यांनी मांडले. महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाकडून दिल्या जाणाऱ्या सुविधा उपक्रम व कार्यक्रम यांची माहिती कल्याण निरीक्षक राजेंद्र निकम यांनी दिली. आरोग्य तपासण्याची माहिती सीपीआर हॉस्पीटलच्या समुपदेशक मंगल माने यांनी दिली.
शिबीरामध्ये कामगार कल्याण अधिकारी विजय शिंगाडे यांचे मार्गदर्शना खाली १२७ कामगारांची आरोग्य तपासणी करण्यात आली. शिबीर यशस्वी करण्यासाठी पल्लवी चव्हाण, गणेश बारटक्के, प्रदीप आवळे, लोटस मेडीकल फौंडेशनचे संदीप चौगुले, जयश्री हरदर, हिराश्री लेक सिटीचे तानाजी धनगर, क्रिडाईचे राजू कोकरे, सचिन शिंगाडे, चंद्रकांत घारगे, दिपक गावरांखे, शोभा पोरे, स्वाती वायचळ, सुजाता कलकुटकी यांनी विशेष प्रयत्न केले.