डी. वाय. पाटील हॉस्पिटलमध्ये ज्ञानशांती आय बँकेचा प्रारंभ

कसबा बावडा (वार्ताहर) : डी. वाय. पाटील ग्रुपचे विश्वस्त आमदार ऋतुराज पाटील यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून डी. वाय. पाटील हॉस्पिटल येथे ज्ञानशांती आय बँकेचा प्रारंभ करण्यात आला. कोल्हापुरातील ख्यातनाम नेत्ररोग तज्ञ डॉ. अतुल जोगळेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत डी. वाय. पाटील विद्यापीठाचे कुलपती डॉ. संजय डी. पाटील यांच्या हस्ते ‘आय बँक’चे (नेत्र पेढी) उद्घाटन झाले.

    यावेळी डॉ. संजय डी. पाटील म्हणाले, रुग्णसेवेला सर्वोच्च प्राधान्य देऊन डी. वाय. पाटील हॉस्पिटल गेल्या १९ वर्षांपासून कार्यरत आहे. गरजू रूग्णांना चांगल्या सुविधा देण्यासाठी आमचा नेहमीच प्रयत्न असतो. त्यातूनच ही आय बँक सुरु करण्यात आली आहे. अंध बांधवांच्या जीवनात प्रकाश निर्माण करण्यासाठी ‘ज्ञानशांती आय बँक’ महत्वाची भूमिका निभावेल. एका व्यक्तीने केलेल्या नेत्रदानामुळे किमान दोन व्यक्तीना दृष्टी मिळू शकते, त्यामुळे मरणोत्तर नेत्रदानासाठी सर्वांनी पुढाकार घ्यावा.

   ‘ज्ञानशांती आय बँक’चे प्रमुख डॉ. मिलिंद सबनीस यांनी नेत्रदानानाची आवश्यकता व प्रक्रीयेबाबत यावेळी सविस्तर माहिती दिली.

 सौ. ममता बगाडे या ‘ज्ञानशांती आय बँक’ च्या पहिल्या नेत्रदात्या ठरल्या आहेत. आपल्या वाढदिवसानिमित्त त्यांनी नेत्रदानाचा अर्ज भरला आहे. त्याचबरोबर ‘आय बँक’च्या उद्घाटनादिवशीच वैद्यकीय अधीक्षिका डॉ. वैशाली गायकवाड, सहाय्यक कुलसचिव अजित पाटील, सुनील चौगले, उमेश वरुटे, उर्मिला खारकर यांनी नेत्रदानासाठी अर्ज भरले. डॉ. संजय डी. पाटील यांच्या हस्ते या सर्वांचा सन्मान करण्यात आला.

यावेळी कुलसचिव डॉ. व्ही. व्ही. भोसले, वित्त अधिकारी श्रीधर स्वामी, अधिष्ठाता डॉ. राकेश कुमार शर्मा, उपकुलसचिव संजय जाधव, सीएचआरओ श्रीलेखा साटम, ‘आय बँक’चे डॉ. संजय रसाळ, डॉ. सोनल आदी उपस्थित होते.