कोल्हापूर : कोल्हापूर महापालिका निवडणुकीसाठी आरक्षणाची सोडत आज, मंगळवारी सकाळी अकरा वाजता केशवराव भोसले नाट्यगृहात जाहीर काढण्यात आली. आरक्षण सोडतीमध्ये अनुसूचित जाती, जमाती, त्याचबरोबर सर्वसाधारण प्रभागातील महिलांसाठी आरक्षण काढण्यात आले.

राज्य निवडणूक आयोगाने १४ महापालिकांना प्रभागनिहाय आरक्षण सोडत जाहीर करण्याचे आदेश दिले होते. या आदेशाअंतर्गत कोल्हापूर महापालिकेसाठी आरक्षण सोडत जाहीर करण्यात आली आहे. कोल्हापूर महापालिकेतील ३१ प्रभागातील ९२ जागांसाठी ही आरक्षण सोडत जाहीर करण्यात आली. यंदा पहिल्यादांच त्रिसदस्य पद्धतीने होणार आहे.
प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांच्या प्रमुख उपस्थितीत महापालिकेच्या शाळेतील विद्यार्थ्यांच्या हस्ते सोडत काढण्यात आली. प्रथम अनुसूचित जातीच्या बारा जागांमधून सहा जागा महिलांसाठी आरक्षित करण्यात आल्या. त्यानंतर अनुसूचित जमातीसाठी राखीव असलेल्या एका प्रभागासाठी चिठ्ठी टाकली. तो अनुसूचित जमातीच्या नागरिकांसाठी खुला राहिला. सर्वसाधारण गटांमध्ये सर्वात जास्त जागा महिलासाठी आरक्षित होत्या.
अनुसूचित जमातीसाठी महिला राखीव न झाल्याने सर्वसाधारण गटामध्ये चाळीस जागा महिलांसाठी राखीव ठेवण्यात आल्या. किमान दोन जागा बिन राखीव असलेल्या प्रभागातील एक जागा सर्वसाधारण महिलेसाठी राखीव ठेवण्यात आली. त्यानुसार 31 जागांचे आरक्षण महिलांसाठी टाकण्यात आले. आणखी नऊ जागांसाठी आरक्षण टाकायचे असल्याने ज्या प्रभागात दोन जागा बिन राखीव होत्या. अशा सतरा प्रभागातून 9 महिलांसाठीच्या जागेसाठी सोडत काढण्यात आली. उर्वरित जागा सर्वसाधारण गटासाठी खुल्या ठेवण्यात आल्या.
असे आहे आरक्षित प्रभाग : अनुसूचित जाती (महिला) – प्रभाग क्रमांक – ७ अ, ४ अ, ९ अ, १३ अ, २८ अ, ३० अ.
अनुसूचित जाती आरक्षित प्रभाग-
प्रभाग क्रमांक – १५ अ, १९ अ, २१ अ, ५ अ , १ अ, १८ अ.
सर्वसाधारण साधारण महिला आरक्षित प्रभाग
प्रभाग क्रमांक – १ ब, २ ब, ३ अ, ४ ब, ५ ब , ६ अ, ६ ब, ७ ब, ८ अ, ८ ब, ९ ब, १० अ, ११ अ, ११ ब, १२ अ, १३ ब, १४ अ, १५ ब, १६ अ, १६ ब, १७ अ, १८ ब, १९ ब, २० अ, २१ ब, २२ अ, २२ ब, २३ अ, २४ अ, २४ ब, २५ अ, २५ ब, २६ अ, २७ अ, २७ ब, २८ ब, २९ अ, ३० ब, ३१ अ
अनुसूचित जमाती- प्रभाग क्रमांक – २ अ.
सर्वसाधारण आरक्षित प्रभाग -प्रभाग क्रमांक – १ क, २ क, ३ ब, ३ क, ४ क, ५ क, ६ क, ७ क, ८ क, ९ क, १० ब, १० क, ११ क, १२ ब, १२ क, १३ क, १४ क, १५ क, १६ क, १७ क, १८ क, १९ क, २० क, २१ क, २२ क, २३ क, २४ क, २५ क, २६ क, २७ क, २८ क, २९ क, ३० क, ३१ ब
सहा जूनपर्यंत हरकतींसाठी मुदत
१ जूनला आरक्षणाचे प्रारूप प्रसिद्ध केले जाईल. त्यानंतर ६ जूनपर्यंत आरक्षणाबाबत हरकती व सूचना महापालिका आयुक्त, मुख्य निवडणूक कार्यालय, सासने ग्राउंडसमोर, ताराबाई पार्क येथे दुपारी ३ वाजेपर्यंत
सादर करण्याची मुदत आहे.
एकूण प्रभाग : ३१
नगरसेवकांची संख्या : ९२
त्रिसदस्य प्रभाग संख्या : ३०
द्विसदस्य प्रभाग संख्या : १
अनुसूचित जातीसाठी आरक्षित होणारे प्रभाग : ६
अनुसूचित जाती महिलांसाठी आरक्षित होणारे प्रभाग : ६
अनुसूचित जमाती प्रभाग संख्या : १
सर्वसाधारण महिला प्रभाग : ४०
खुला : ३९ किंवा ४०