राज ठाकरे मुंबईतील लिलावती रुग्णालयात दाखल

मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आज मुंबईतील लिलावती रुग्णालयात दाखल झाले आहेत. उद्या, बुधवारी त्यांच्यावर शस्त्रक्रिया केली जाणार आहे. राज ठाकरे यांच्या पायाचं दुखणं वाढलं असून त्यांच्यावर हिप बोनची शस्त्रक्रिया केली जाणार आहे.

टेनिस खेळताना राज ठाकरे यांच्या पायाला दुखापत झाली होती. हीच दुखापत पुन्हा एकदा बळावली आहे. त्यामुळे डॉक्टरांनी हिप बोनची शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला दिला. त्यानुसार उद्या लिलावती रुग्णालयात ही शस्त्रक्रिया पार पडेल. पुण्यातील कार्यक्रमात राज ठाकरे यांनी आपल्या शस्त्रक्रियेबद्दल माहिती दिली होती. ते म्हणाले होते की, १ जूनला माझ्या हिप बोनची शस्त्रक्रिया आहे. राज ठाकरे यांच्यावर शस्त्रक्रिया झाल्यानंतर त्यांना साधारण दोन महिन्यांची सक्तीची विश्रांती घ्यावी लागणार आहे.

🤙 8080365706