युपीएससीत कोल्हापूरचा डंका; आशिष पाटील, स्वप्नील मानेचे यश

कोल्हापूर : केंद्रीय लोकसेवा आयोगाने (यूपीएससी) घेतलेल्या मुख्य परीक्षेत कोल्हापूरचा डंका वाजला आहे. शाहूवाडी तालुक्यातील आशिष पाटील याने देशात ५६३  वा क्रमांक मिळवला. तर कागल तालुक्यातील सिद्धनेर्लीतील स्वप्नील तुकाराम माने याने ५७८ वा क्रमांक पटकावला. या दोघांच्या यशाने कोल्हापूर जिल्ह्याचे नाव यूपीएससीच्या गुणवत्ता यादीत झळकले आहे.

स्पर्धा परीक्षेत पॅटर्न बनलेल्या शाहूवाडी तालुक्याचा पुन्हा डंका एकदा वाजला असून युपीएससी परीक्षेत साळशी गावच्या तरुणाने शाहूवाडी तालुक्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. केंद्रीय लोकसेवा आयोगाने (यूपीएससी) घेतलेल्या मुख्य परीक्षेत साळशी येथील आशिष अशोक पाटील याने देशात ५६३ वा क्रमांक मिळवला. आशिष याचे वडील प्राथमिक शिक्षक आहेत.

तर कागल तालुक्यातील सिद्धनेर्लीतील स्वप्नील तुकाराम माने याने देशात ५७८ वी रँक मिळवत बाजी मारली आहे. विशेष म्हणजे आई वडिलांचे छत्र हरवले असताना  स्वतः कमवून त्याने आपला इथपर्यंतचा प्रवास पूर्ण करत आईवडिलांचे स्वप्न पूर्ण केले.