कसबा बावडा : डी. वाय. पाटील पॉलिटेक्निकचे विद्यार्थी शैक्षणिक गुणवत्तेबरोबरच कला, क्रीडा, सांस्कृतिक, सामाजिक क्षेत्रात आघाडीवर असल्याचे गौरवोद्गर डी. वाय. पाटील ग्रुपचे विश्वस्त, आमदार ऋतुराज पाटील यांनी काढले. कसबा बावडा येथील डॉ. डी. वाय. पाटील पॉलिटेक्निक येथे गुणवंत विध्यार्थी सत्कार सोहळ्यात ते बोलत होते.
डॉ. डी. वाय. पाटील पॉलिटेक्निक येथे विविध क्रीडा स्पर्धा, सांस्कृतिक स्पर्धा, प्रोजेक्ट, मेहंदी, रांगोळी या स्पर्धांमधील विजेते विद्यार्थी आणि शैक्षणिक गुणवत्ता प्राप्त विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता.
प्राचार्य डॉ. महादेव नरके यांनी पॉलिटेक्निकच्या माध्यमातून विद्यार्थ्यांसाठी राबविण्यात येत असलेल्या विविध उपक्रमांची माहिती दिली.
कार्यकारी संचालक डॉ. ए. के.गुप्ता यांनीही मनोगत व्यक्त केले. यावेळी गेल्या वर्षभरात डी. वाय. पाटील पॉलिटेक्निकच्यावतीने घेण्यात आलेल्या विविध स्पर्धा तसेच शैक्षणिक उपक्रम यामध्ये यश संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी उपप्राचार्य मीनाक्षी पाटील रजिस्ट्रार प्रा. सचिन जडगे, प्रा अक्षय करपे, प्रा. बी जी शिंदे , प्रा नितीन माळी आदी उपस्थित होते. प्रा. वृषाली पाटील यांनी सूत्रसंचालन केले.