कोल्हापूर : कोल्हापूर – रत्नागिरी महामार्गावर केर्ली गावाजवळ महिंद्रा पिकअप गाडीने ओव्हरटेक करताना मोटरसायकलस्वारास उडवल्याने झालेल्या अपघातात पोर्ले (ता. पन्हाळा) येथील शंकर तुकाराम पाटील हे निवृत्त पोलीस निरीक्षक जागीच ठार झाले. ही घटना शुक्रवारी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास घडली. घटनास्थळी करवीर पोलिसांनी पंचनामा केला.
याबाबतची अधिक माहिती अशी, पोर्ले तर्फ ठाणे (ता. पन्हाळा) येथील शंकर तुकाराम पाटील हे पोलिस खात्यातून तीन वर्षांपूर्वी पोलीस निरीक्षक म्हणून निवृत्त झाले होते. निवृत्तीनंतर सध्या ते तीन वर्षे ते कायद्याचे शिक्षण घेत होते. आज दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास शंकर पाटील कोल्हापूरहून त्यांच्या ॲक्टिवा गाडीवरून पोर्ले गावाकडे जात असताना समोरून येणाऱ्या पिकअप गाडीने त्यांना जोरदार धडक दिली. यावेळी त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत होऊन ते खाली कोसळले. डोक्याला गंभीर दुखापत झाल्यामुळे ते जागीच ठार झाले. त्यांच्या ऍक्टिवा गाडीचे मोठे नुकसान झाले आहे. यावेळी घटनास्थळी करवीर पोलिसांनी पंचनामा केला आणि मयत शंकर पाटील यांचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी सीपीआर हॉस्पिटल येथे नेण्यात आला.
पोर्ले येथील एका शेतकरी कुटुंबात जन्म घेतलेले शंकर पाटील कोल्हापुरातील शहाजी कॉलेज व विवेकानंद कॉलेज येथे त्यांचे शिक्षण झाले होते विद्यार्थीदशेत शिक्षण घेत कबड्डी आणि कुस्ती खेळांमध्ये ते निष्णात होते १९८५ साली ते पोलीस भरती झाले. त्यानंतर कोल्हापूर रत्नागिरी सिंधुदुर्ग मुंबई आदी ठिकाणी त्यांनी पोलिस सेवा बजावली. अखेरच्या काळात पोलीस निरीक्षक पदावरून ते निवृत्त झाले होते. निवृत्तीनंतर सध्या गेली तीन वर्षे त्यांनी कायद्याचे शिक्षण घेत होते.
त्यांच्या पश्चात पत्नी दोन मुलगे सुना नातवंडे असा परिवार आहे. पंधरा दिवसापूर्वी त्यांच्या घरी त्यांचा मुलगा अभिजीत यांचा विवाहसोहळा कार्यक्रम झाला होता.