संभाजीराजेंनी शिवबंधन हातात बांधावे : संजय राऊत

मुंबई : राज्यसभेसाठी सहावा उमेदवार शिवसेनेचाच असेल. संभाजीराजे छत्रपती यांनी शिवबंधन हातात बांधावे. शिवसेनेची उमेदवारी स्विकारुन राज्यसभेची निवडणूक लढवावी, असं शिवसेना खासदार संजय राऊत  यांनी म्हटलं आहे.

राऊत म्हणाले, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे जो निर्णय घेतील तोच पक्ष पुढे नेईल. फक्त खास राज्यसभा निवडणुकीवरच चर्चा झालेली नाही. मराठा संघटना प्रमुखांचंही काही म्हणणं आहे. संभाजीराजे छत्रपतींचंही काही म्हणणं आहे. तसेच, शिवसेनेचाही मुद्दा आहे. आम्हा सर्वांचं, तसेच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंचं म्हणणं आहे की, सहावी जागा शिवसेनेची आणि शिवसेनेचा उमेदवार त्या जागेवरुन लढेन आणि विजयी होईल. सहावी जागा ही शिवसेनेचीच असेल. संभाजीराजे छत्रपती हे आमचेच आहेत. त्यांचं आमचं एक नातं आहे. आम्ही त्यांना विनंती केली आहे की, तुम्हाला जर ही निवडणूक लढायची असेल, तर शिवसेनेत या मग त्यासंदर्भात मुख्यमंत्री निर्णय घेतील. यामध्ये कोणाच्या भावना दुखावण्याचा प्रश्न येत नाही.