सिद्धनेर्ली : सिद्धनेर्ली येथे कागल – निढोरी राज्य मार्गालगत शिवम टाइल्सच्या समोर असणाऱ्या विजेच्या खांबाजवळ विजेच्या तारेला स्पर्श होवून शिवाजी तांदळे सिद्धनेर्ली या मेंढपाळाच्या तीन मेंढ्या मृत्यूमुखी पडल्या. आज दुपारी दोनच्या सुमारास ही घटना घडली.
पाऊस व मुख्य वाहिनीचा अर्थिंग तारेला स्पर्श झाल्याने ही घटना घडली यावेळी इतर .तीन मेंढ्यांना लाकडाच्या ओंडक्याने सोडविण्यात आले मेंढपाळ ही यातून सही सलामत बचावला
सदर विद्युत खांब रस्त्यालगत असल्याने सदर घटना गंभीर आहे यावेळी एम.एस. ई.बी चे सहाय्यक विद्युत अभियंता अभिलाश बारापात्रे यांनी भेट देवून संबंधित घटनेची पाहणी केली पशुसंवर्धन विभागाचे वैदयकीय अधिकारी तालुका प्रमुख डॉ. घनवट व पशुधन पर्यवेक्षक आर वाय माने यांनी शवविच्छेदन केले. यावेळी महाराष्ट्र राज्य धनगर समाज जिल्हाध्यक्ष राघू हजारे, वायरमन उदय भिसुरे, दिलीप पोवार उपस्थित होते.