कोल्हापूर शहरात पावसाची जोरदार हजेरी

कोल्हापूर : गेल्या अनेक दिवसापासून दडी मारलेल्या पावसाने कोल्हापूर शहरात जोरदार हजेरी लावली. दोन दिवसापासून ढगाळ वातावरण होते. आज सायंकाळी वारा, विजांच्या गडगडटात पावसाच्या सरी कोसळल्या.

दोन दिवसापासून प्रचंड उष्म्याने काहिली काहिली होत असतानाच गुरुवारी सायंकाळी झालेल्या पावसाने शहरावासियांना दिलासा मिळाला. अचानक झालेल्या पावसाने अनेकांची तारांबळ उडाली. अनेकांनी इमारती आणि शहरातील ठिकठिकाणच्या दुकानाच्या ठिकाणी आसरा घेतला. शहराच्या सर्वच् भागात कमी अधिक प्रमाणात पावसाच्या सरी कोसळल्या आहेत.