कोल्हापूर : कोल्हापूरची कन्या कस्तुरी सावेकर हिने माऊंट एव्हरेस्ट शिखर सर करून जगातील उंच शिखरावर भारताचा तिरंगा झेंडा फडकवला आहे.
कस्तुरी 24 मार्च 2022 ला माऊंट एव्हरेस्ट मोहिमेला गेलेली आहे. या मोहिमेतील सरावाचा भाग म्हणून कस्तुरीने सरावासाठी (चढाईसाठी) जगातील 14 अष्टहजारी शिखरांपैकी सर्वात अवघड व खडतर असणारे दहाव्या क्रमांकाचे शिखर माऊंट अन्नपूर्णा -1 शिखर उंची 26545 फूट निवडले व यशस्वीरित्या सर केले. कमी वयात अन्नपुर्णा शिखर सर करणारी ती जगातील तरुण गिर्यारोहक ठरली होती.
त्यानंतर पुढचे पाऊल माऊंट एव्हरेस्ट मोहीम सर करण्याचे तिचे ध्येय होते. त्यासाठी तिची तयारी सुरु होती. आज सकाळी सहा वाजता एव्हरेस्ट सर करून भारताचा तिरंगा ध्वज फडकवला.
.