राज्यातील निवडणुका कधी होणार?, सर्वोच्च न्यायालय ‘या’ दिवशी निर्णय देणार

मुंबई : दोन आठवड्यात निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्याचा आदेश राज्य निवडणूक आयोगाला सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. तर निवडणुका सप्टेंबरमध्ये घ्याव्यात अशी याचिका राज्य निवडणूक आयोगाने सर्वोच्च न्यालयात केली आहे. या याचिकेवर १७ मे रोजी सुनावणी होणार आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर निवडणुका कधी होणार हे स्पष्ट होणार आहे.

राज्य निवडणूक आयोगाच्या अर्जावर सुप्रीम कोर्टात मंगळवार 17 मे रोजी सुनावणी होणार आहे. महापालिका नगरपंचायत सप्टेंबरमध्ये आणि जिल्हा परिषद ग्रामपंचायतीच्या निवडणुका ऑक्टोबरमध्ये घ्यावी अशी विनंती राज्यनिवडणूक आयोगाकडून करण्यात आली आहे. पावसाळा असल्यामुळे निवडणुका घेण्यास अडचणी येऊ शकतात. गेल्या अनेक दिवसांपासून काही महानगरपालिकांवर प्रशासक असल्यामुळे तात्काळ निवडणुका घेण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. राज्य निवडणूक आयोगाच्या मागणीनुसार निवडणुका सप्टेंबरमध्ये होणार का? असा प्रश्न निर्माण झाला आहे. सर्वोच्च न्यायालयात राज्य निवडणूक आयोगाने सप्टेंबर आणि ऑक्टोबर  महिन्यात निवडणुका घेण्याची विनंती करणारा अर्ज 2 दिवसापूर्वी दाखल केला आहे. या अर्जावर १७ मे रोजी निर्णय देण्यात येणार आहे.