कोल्हापूर : ग्रामपंचायत स्तरावरील प्रगतीपथावरील कामे तातडीने पूर्ण करा, अशा सूचना जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण यांनी केल्या.
करवीर व गगनबावडा तालुक्यातील ग्रामपंचायती कडील विविध विषयांचा आढावा घेणेसाठी आज तालुका स्तरावर सरपंच व ग्रामसेवक यांच्या आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. यामध्ये स्वच्छ भारत मिशन अंतर्गत सार्वजनिक शौचालय बांधकाम, वैयक्तिक शौचालय, पाणी गुणवत्ता कामकाज , घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापन अंतर्गत झालेल्या कामाचा आढावा घेण्यात आला. तसेच जलजीवन मिशन, व ग्रामपंचायत विभागाकडील विविध विषयांचा आढवाही घेण्यात आला.
या बैठकीसाठी उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रा.प.) अरुण जाधव, जलजीवन मिशनच्या प्रकल्प संचालक प्रियदर्शिनी मोरे, ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता अशोक धोंगे, करवीरचे गटविकास अधिकारी जयवंत उगले, उप अभियंता बारटक्के उपस्थित होते. यावेळी ग्राम पंचायतनिहाय कामांचा आढावा घेऊन मार्गदर्शन करण्यात आले. व प्रगती पथावरील सर्व कामे तात्काळ पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या. यावेळी स्वच्छ भारत मिशन अंतर्गत उत्कृष्ट काम केल्या बद्दल ग्रामसेविका सुरेखा आवाड यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
