पुणे : दहावी आणि बारावीची परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी असून लवकरच दहावी आणि बारावीचा निकाल जाहीर होणार आहे. येत्या 10 जूनपर्यंत बारावी बोर्डाच्या परीक्षेचा निकाल जाहीर करणार येणार आहे. तर 20 जूनपर्यंत दहावी बोर्डाच्या परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात येणार आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने सोमवारी ही माहिती दिली.
दहावी आणि बारावी बोर्ड परीक्षेच्या पेपर तपासणीचे काम जवळपास पूर्ण होत आले आहे. सध्या दहावी आणि बारावी परीक्षेचे निकाल तयार करण्याचे काम सुरु आहे. शिक्षकांनी पेपर तपासणीवर बहिष्कार टाकल्यामुळे निकाल उशिरा लागेल असे म्हटले जात होते. पण आता निकाल वेळेतच लागणार असल्याचे स्पष्ट झाले आहे
कोरोना महामारीमुळे तब्बल दोन वर्षे दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा ऑनलाईन पद्धतीने घेण्यात आली होती. पण कोरोनाचा वेग मंदावल्यानंतर आणि रुग्णसंख्या कमी झाल्यानंतर सरकारने सर्व निर्बंध शिथील केले. त्यानंतर शाळा आणि कॉलेज सुरु करण्यात आली. यावर्षीची दहावी आणि बारावीची परीक्षा ऑफलाईन पद्धतीने घेण्यात आली होती. कोरोनामुळे विद्यार्थ्यांच्या लिखाणाचा सराव कमी झाल्यामुळे परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना जास्त वेळ देखील देण्यात आला होता.