इचलकरंजीत आता महानगरपालिका

कोल्हापूर: इचलकरंजी नगरपालिकेचे रुपांतर आता महानगरपालिकेत होणार असून तशी घोषणा करण्यात आली आहे. इचलकरंजी आता राज्यातील २८ वी महानगरपालिका घोषित करण्यात आली आहे. त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील महापालिकांची संख्या आता दोनवर पोहोचली आहे.

राज्य शासनाच्या वतीने इचलकरंजी महानगरपालिकेची घोषणा करण्यात आली आहे. इचलकरंजीची ओळख ही महाराष्ट्राचे मॅन्चेस्टर अशी आहे. वस्त्रोद्योगासाठी इचलकरंजी हे प्रसिद्ध असून लोकसंख्याही मोठी आहे. त्यामुळेच इचलकरंजी ही महानगरपालिका घोषित करावी यासाठी अनेक वर्षे मागणी सुरू होती. आता इचलकरंजी महानगरपालिकेच्या या पाठपुराव्याला यश आलं आहे. खासदार धैर्यशील माने यांना राज्य शासनाकडून नव्या इचलकरंजी महापालिकेच्या मान्यतेचे पत्र मिळाले आहे.

या शहरात नगरपालिका असून त्याचे रुपांतर महापालिकेत करण्यात यावेत यासाठी गेली अनेक वर्षे प्रयत्न सुरू आहेत. आता या प्रयत्नांना यश आले असून या नगरपालिकेचे रुपांतर आता महापालिकेत होणार आहे. राज्यात या आधी २७ महापालिका होत्या. आता इचलकरंजीच्या रुपात २८ व्या महापालिकेची भर यात पडणार आहे.

🤙 8080365706