गारगोटी (प्रतिनिधी) : राज्य शासनाचे वतीने गरीब-गरजू कुटुंबातील व्यक्तीस अर्थ सहाय्य देण्याच्या उद्देशाने सुरू करण्यात आलेल्या संजय गांधी निराधार योजना, श्रावण बाळ निराधार योजना व इंदिरा गांधी निराधार योजनेच्या माध्यमातून पेन्शन देण्यात येते. या योजनेकरीता भुदरगड तालुक्यातील कोणताही पात्र लाभार्थी वंचित राहू नये यासाठी संजय गांधी निराधार समितीच्यावतीने प्रभावीपणे काम करावे असे आवाहन आमदार प्रकाश आबिटकर यांनी केले.
राज्य शासनाच्या संजय गांधी, श्रावणबाळ, इंदिरा गांधी, अन्न सुरक्षा यादीतील प्रात्र लाभार्थी, दुबार रेशन कार्ड, नवीन रेशन कार्ड, निराधार योजनेतंर्गत भुदरगड तालुक्यातील 578 लाभार्थ्यंना मंजूरी पत्रांचे वाटप कार्यक्रमात ते बोलत होते.
आमदार प्रकाश आबिटर म्हणाले की, या पेन्शन योजनेच्या माध्यमातून समाजातील गरीब-गरजू लाभार्थ्यांना या योजनांचा अधिकाधिक लाभ मिळावा याकरीता महसूल विभागातील तलाठी, मंडळ अधिकारी व तहसीलदार यांनी सामाजिक जाणिवेतून सहकार्य करावे. याकरीता तलाठी मंडळींनी उत्पन्नाचा दाखला द्यावा जेणेकरून जास्तीत जास्त लाभार्थ्यांना पेन्शन मंजूर करण्यास सहकार्य होईल.
संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष प्रकाश पाटील म्हणाले, राज्य व केंद्र सरकातर्फे राज्यात गोरगरीब व निराधारांसाठी सरकारने विविध पेन्शन योजना राबविल्या आहेत. त्यात संजय गांधी निराधार योजाना, श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन व इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्ती वेतन या आदी योजनेअंतर्गत वृद्ध व निराधारांना अनुदान दिले जाते. योजेनेच्या प्रकारानुसार सहाशे ते एक हजारांचे अनुदान मिळते. तालुक्यातीत प्रत्येक गरजू लाभार्थ्यांना लाभ मिळवून देण्यासाठी मी आमचे सर्व सदस्य कठिबध्द असल्याचे सांगितले.
यावेळी तहसीलदार अश्विन आडसूळ, समितीचे सदस्य तात्या पाटील, श्रीधर भोईटे, तानाजी जाधव, संग्रामसिंह सावंत, सदस्या वैशाली पाटील, युवासेना तालुकाप्रमुख विद्याधर परीट यांच्यासह प्रमुख मान्यवर व लाभार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
