उचगाव : महात्मा जोतिबा फुले जन आरोग्य योजने अंतर्गत गोरगरना वैद्यकीय सेवा, तपासणी व शस्त्रक्रिया, उपचार या सेवा अगदी मोफत आहेत. मोफत ह्रदय रोग चिकित्सा, निदान व शस्त्रक्रिया स्वस्तिक हाँस्पिटलचे डॉ. अर्जुन आडनाईक यांच्या मार्गदर्शनाखाली होत आहेत. त्याचा लाभ जनसामान्य गरजू लोकांनी घ्यावा, असे प्रतिपादन माजी आमदार अमल महाडिक यांनी केले.
उचगाव (ता. करवीर) येथील माजी ग्रा. प. सदस्य दत्तात्रय तोरस्कर यांच्या सामाजिक बांधिलकी उपक्रमातून मोफत आरोग्य जनजागृती शिबिराच्या उदघाटनप्रसंगी ते बोलत होते.
यावेळी युवा ग्रामीण विकास संस्था, मोहन सातपुते यांच्या मार्गदर्शनाखाली स्थलांतरित कामगार लक्षगट हस्तक्षेप प्रकल्प, गोकूळ शिरगाव व कागल एमआयडीसी अंतर्गत मोफत एचआयव्ही/ एड्स, गुप्तरोग, क्षयरोग, जनरल आरोग्य विषयी सल्ला मार्गदर्शन व मोफत आरोग्य जनजागृती शिबीरही पार पडले.यासाठी करवीर निवासिनी श्री. महालक्ष्मी कुरीजचे संचालक दिगबर तोरस्कर यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
या आरोग्य शिबिराला अभिजीत पाटील, विजय हकारे धिरज निकम, महादेव दरुर ,सागर सूर्यवंशी ,उमेश देशमुख ,नामदेव वाईंगडे(ND), रूपेश परीट, वैशाली कांबळे, संदीप पाटील, परशराम पाटील, दिगबर तोरस्कर,संजय कांबळे, शरद रेडेकर राजेंद्र माळी व डॉ.सुरेश पाटील, डॉ.स्वप्नील जाधव, संजय चौगुले, संजय मेहता, संदीप सावंत, किरण सावंत, महेश पोवार, प्रियंका कांबळे, पूनम बोडेकर, सुजाता राजपाल, दीपाली सातपुते, प्रल्हाद कांबळे, आनंद सज्जन, शारदा गुरव, विजय राजपाल यांच्या सह महिला, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.