कोल्हापूर पोटनिवडणुकीसाठी 60.09 टक्के मतदान

कोल्हापूर : कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदार संघासाठी आज सकाळी 7:00 ते सायंकाळी 6:00 या कालावधीत 357 मतदान केंद्रावर अंदाजे एकूण 60.09 टक्के मतदान झाले असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी श्रावण क्षीरसागर यांनी दिली.

           आज सकाळी 7 वाजल्यापासून कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघात मतदान प्रक्रियेस शांततेत सुरुवात झाली. सकाळी 7 ते 9 या कालावधीत 6.96 टक्के, सकाळी 11:00 वाजेपर्यंत 20.57 टक्के, दुपारी एक पर्यंत 34.18 टक्के, तर दुपारी 3:00 वाजेपर्यंत 44.93 टक्के, सायंकाळी 5:00 वाजेपर्यंत 55.26 टक्के मतदान, तर सायंकाळी 6:00 वाजेपर्यंत एकूण अंदाजित 60.09 टक्के मतदान झाले आहे.