माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांची सीबीआय कोठडीत रवानगी

मुंबई : विशेष सीबीआय न्यायालयाने बुधवारी महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना ११ एप्रिलपर्यंत सीबीआय कोठडी सुनावली. आज न्यायालयात सीबीआयचे वकील आणि अनिल देशमुख यांच्या वकिलांत जोरदार वादावादी झाली.

भ्रष्टाचाराच्या आरोपांच्या चौकशीत सीबीआयने आज अनिल देशमुख यांना मुंबईच्या आर्थर रोड कारागृहातून ताब्यात घेतले. आता न्यायालयाने त्यांची सीबीआय कोठडीत रवानगी केली आहे. अनिल देशमुख यांच्यावर मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी भ्रष्टाचाराचे आरोप केले होते. उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर गुन्हा दाखल करण्यात आल्याचे सीबीआयच्या वकिलांनी आज न्यायालयात सांगितले. या प्रकरणात संजीव पालांडे, कुंदन शिंदे आणि सचिन वाझे यांचाही सहभाग असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे, असे सीबीआयने न्यायालयाला सांगितले. अनिल देशमुख यांनाही अटक करावी आणि चौघांची समोरासमोर चौकशी करता यावी यासाठी त्यांची कोठडी आवश्यक असल्याचे सीबीआयच्या वकिलांनी न्यायालयाला सांगितले.

🤙 8080365706