कोल्हापूर : परिवर्तनाची सुरूवात कोल्हापूर उत्तर मतदार संघातून होणार असून पूरग्रस्तांना आधार देणार्या भाजपच्या सत्यजित कदम यांना पाठिंबा देण्याची हीच वेळ, असून सत्यजित कदम यांनाच जनता निवडून देईल, असा ठाम विश्वास भाजप महिला मोर्चाच्या अध्यक्षा उमाताई खापरे यांनी व्यक्त केला. कपूर वसाहतमध्ये भाजपचे उमेदवार सत्यजित कदम यांच्या प्रचारसभेत त्या बोलत होत्या.
यावेळी माजी खासदार धनंजय महाडिक, महेश जाधव, , भगवान काटे, सुनिल कदम, , गायत्री राऊत, कविता माने, वैभव माने,, सौ. चिंचकर, यांच्यासह मान्यवर आणि नागरिक उपस्थित होते.
उमाताई खापरे म्हणाले, भाजपची बांधिलकी जनतेशी आहे. शेतकरी,, कामगार,, कष्टकरी आणि सर्वसामान्य नागरिकांच्या कल्याणासाठी भाजपने राज्यात आणि देशात अनेक योजना आणल्या. २०१४ ते २०१९ या पाच वर्षात भाजपने राज्यात भ्रष्टाचारमुक्त कारभार केला. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारने दैदिप्यमान कामगिरी केली आहे. प्रत्येक भारतीयाला अभिमान वाटावा, असे मोदी यांचे नेतृत्व आहे. त्यामुळेच नुकत्याच झालेल्या पाच राज्यांच्या निवडणुकीत, भाजपला सर्वाधिक यश मिळाले. कॉंग्रेसचा पुर्ण धुव्वा उडाला असून, राज्यातील महाविकास आघाडी सरकारमध्ये सत्ताधारी तीन पक्षांची तीन दिशेला तोंडे आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा राज्यातील जनतेला भाजपचे महत्व पटले आहे. परिवर्तनाची सुरूवात कोल्हापूर उत्तर मतदार संघातून होईल आणि लवकरच राज्यात पुन्हा भाजपचे सरकार येईल.
त्या म्हणाल्या, गेल्या ६० वर्षात कॉंग्रेसच्या एकाही नेत्याला महिला आमदार असाव्यात, असे वाटले नाही आणि आता अचानक शिवसेनेला डावलून कॉंग्रेसने कोल्हापूर उत्तर मतदार संघावर दावा सांगून जनतेच्या डोळयात धुळफेक केली आहे.
भाजपकडे विकासाची दृष्टी आणि भ्रष्टाचारमुक्त कारभार असल्यामुळे, आता कॉंग्रेसच्या नेत्यांकडून जनतेची दिशाभूल केली जात आहे. मात्र महाविकास आघाडीच्या कारभाराला वैतागलेल्या जनतेकडून आता भाजपच्या सत्यजित कदम यांचीच निवड केली जाईल, , असा ठाम विश्वास उमाताई खापरे यांनी व्यक्त केला.