मुंबई : आमदार पळून जातील आणि सरकार पडेल या भीतीनेच आमदारांना घरे देण्याचा निर्णय महाविकास आघाडी सरकारने घेतल्याची टीका भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी केली.
चंद्रकांतदादा म्हणाले, आमदार पळून जातील आणि सरकार पडेल या भीतीनेच गेल्या काही दिवसापासून आमदारावर सवलतींचा वर्षाव केला जात आहे. दोन कोटींचा आमदार निधी कोरोना असतानाही चार कोटी केला. आता त्यात वाढ करून तो पाच कोटी केला आहे. आमदारांच्या चालकांचे, स्वीय सहाय्यकाचे पगार वाढवले आहेत. त्यातच आता मोफत घरं दिली जाणार आहेत. आमदार व्हा म्हणून नारळ दिला होता का? कशासाठी घरं पाहिजेत? असा सवालही त्यांनी केला.