तेलंगणाचे मुख्यमंत्री अंबाबाई चरणी !

कोल्हापूर : तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी सहकुटुंब कोल्हापुरात करवीर निवासिनी श्री अंबाबाईचे दर्शन घेतले. के. चंद्रशेखर राव व त्यांच्या पत्नी शोभा हे विशेष विमानाने कोल्हापूर विमानतळावर सकाळी दहाच्या सुमारास पोहोचले. त्यानंतर ते अंबाबाई मंदिराकडे गेले. त्यांच्या सुरक्षेसाठी मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

 अंबाबाईच्या दर्शनानंतर बोलताना के. चंद्रशेखर राव म्हणाले, अंबाबाईच्या दर्शनाला जावे, ही बऱ्याच दिवसापासूनची इच्छा होती. आज आईचे बोलावणे आले आणि इच्छा पूर्ण झाली असून आई अंबाबाईचे दर्शन झाल्यानंतर प्रसन्न वाटत आहे.