कोल्हापूर : भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे नेते, राज्य सचिव मंडळ सदस्य व राष्ट्रीय कौन्सिलचे सदस्य तथा महाराष्ट्र राज्य किसान सभेचे सरचिटणीस कॉम्रेड नामदेवराव गावडे (वय ६५) यांचे रात्री मंगळवारी रात्री १ वाजण्याच्या सुमारास हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले.
बीड (ता. करवीर) या त्यांच्या मूळ गावी आजच दुपारी २ वाजता त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. नामदेव गावडे यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नावर अनेक आंदोलने करून शेतकऱ्यांना न्याय मिळवून दिला आहे. शेतकऱ्यांच्या विषयावर त्यांनी अनेक पुस्तके लिहिलेली आहेत. तसेच कुंभी-कासारी सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष म्हणून त्यांनी काही काळ काम केले होते.