कोल्हापूर (प्रतिनिधी) :कोल्हापूर येथील
वुशू असोसिएशन ऑफ कोल्हापूर डिस्ट्रिक्ट संलग्न ऑल महाराष्ट्र वुशू असोसिएशनच्या वतीने महावीर गार्डन येथे पर्यावरणपूरक रंगपंचमी साजरी करण्यात आली.
“पाणी वाचवा पाणी जिरवा”” पाणी हेच जीवन”” पाण्याची करू नका हानी होईल निसर्गाची हानी” पाणी वाचवू निसर्ग सौंदर्य वाढवू” “पाण्याची नासाडी निसर्गाची नासाडी” पर्यावरणाचे रक्षण करू या उद्देशाने कोरडे व नैसर्गिक रंगांचा वापर करून रंगपंचमी उत्साहात साजरी केली.
यावेळी तसेच निसर्गमित्र संस्थेच्या वतीने ,फुले-फळे पासून बनवलेले नैसर्गिक कलरचा वापर करण्यात आला.
या उपक्रमास संघटनेचे उपाध्यक्ष सतीश वडणगेकर, ओम मेहता, सोहम कुरणे,सिमरण कुरणे ,ऋतविका शिंदे.,साची शिंदे,ऐतवीका मेहता, सचिन भिसे,इ. प्रशिक्षक,खेळाडू ,पालक उपस्थितीत होते.