मुख्य निवडणूक अधिकारी सोमवारी जिल्हा दौऱ्यावर

कोल्हापूर : प्रधान सचिव व मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे सोमवारी कोल्हापूर जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. कोल्हापूर उत्तर विधानसभेच्या पोटनिवडणुकीबाबत आढावा बैठक घेणार आहेत.

दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे : सोमवारी दि. २१ मार्च रोजी दुपारी दोन वाजता कोल्हापूर येथे त्यांचे आगमन होणार आहे. दुपारी तीन वाजता शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. डी. टी. शिर्के यांच्या समवेत बैठक होणार आहे. मंगळवारी दि. २२ मार्चला सकाळी ११ वाजता कोल्हापूर उत्तर विधानसभा पोट निवडणुकीबाबत राजकीय पक्षांसोबत आढावा बैठक तर दुपारी १२ वाजता कोल्हापूर पोलीस महानिरीक्षक व पोलीस अधीक्षक यांच्यासमवेत कायदा व सुव्यवस्थेबाबत बैठक होणार आहे. दुपारी तीन वाजता पत्रकार परिषद होणार आहे.