कोल्हापूर : समाज परिवर्तनामध्ये युवकांची भूमिका महत्त्वपूर्ण ठरलेली असून सध्याचा बदललेल्या परिस्थितीत ही भूमिका अधिकच व्यापक व आव्हानात्मक झालेले आहे युवकांनी समाजाचे विविध प्रश्न जाणून घेऊन त्याबाबत तत्पर असणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन संयोगिता राजे छत्रपती यांनी केले.
सायबर महाविद्यालयाच्या दिनकरराव शिंदे समाज कार्य विभागामार्फत जागतिक समाजकार्य दिनाचे औचित्य साधून बिंदू चौकातून काढलेल्या समाज प्रबोधन रॅलीच्या उद्घाटनाप्रसंगी त्या बोलत होत्या.
यावेळी शहर पोलिस उपविभागीय अधिकारी मंगेश चव्हाण म्हणाले, जिद्द व चिकाटी यावर माणूस आयुष्यात कोणतेही ध्येय साध्य करू शकतो. विद्यार्थ्यांनी आयुष्यामध्ये चांगले ध्येय बाळगावे.
या समाज प्रबोधन रॅलीची सुरुवात महात्मा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून विद्यार्थ्या मार्फत सामाजिक समस्येवर आधारित पटनाट्य व चळवळीची गाणी सादर करण्यात आली. त्यानंतर प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते हेल्पलाइन नंबरच्या पत्रकाचे अनावरण करण्यात आले. या रॅलीमध्ये सुमारे दीडशेहून अधिक विद्यार्थी विद्यार्थिनी सहभागी झाले होते. रॅली बिंदू चौक, शिवाजी पुतळा, भवानी मंडप ,खांबी गणेश मंदिर ,महाद्वार रोड, खाटीक मार्केट व परत बिंदू चौकात या रॅलीची समाप्ती झाली. रॅलीचे आयोजन समाजकार्य विभाग प्रमुख डॉ. दीपक भोसले यांनी केले. याप्रसंगी सायबर संचालक डॉ. सी एस दळवी डॉ. टी.व्ही .जी शर्मा ,डॉ. एस व्ही शिरोळ, डॉ. सोनिया राजपूत, डॉ.सुरेश आपटे, डॉ.कालिंदी रानभरे, डॉ. दुर्गेश वळवी, डॉ. बी एन पाटील, डॉ. प्रकाश रणदिवे, प्रा.पूनम माने, डॉ. उर्मिला चव्हाण, डॉ. शुभांगी पाटील इत्यादी उपस्थित होते. सूत्रसंचालन डॉक्टर सुरेश आपटे यांनी केले तर आभार तेजस्वी मेटकरी यांनी मानले.