दारुड्या शिक्षकाकडून गुप्तांगावर चाकूने वार करून पत्नीचा खून

यवतमाळ : चारित्र्यावर संशयावरून दारुड्या शिक्षकाने पत्नीच्या गुप्तांगावर चाकूने वार करून तिचा निर्घृण खून केल्याची घटना यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी शहरात घडली. मारोती विठ्ठल आरके (वय ३५) असे संशयित आरोपी शिक्षकाचे नाव आहे. तर विमल (वय ३०) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे.

   याबाबत अधिक माहिती अशी, आर्णी शहरातील स्वामी समर्थनगरमध्ये राहत असलेल्या मारोती आरके लोणी येथील राष्ट्रीय माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळेत शिक्षक होता., त्याचा कुऱ्हा येथील विमल हिच्यासोबत विवाह झाला. त्यांना समर्थ (वय ८) आणि दत्त (वय ४) अशी दोन मुलेही झाली. त्यांचा संसार सुखात चालला होता. मात्र,  मारोती दारूच्या आहारी गेला. तो पत्नी विमलच्या चारित्र्यावर संशय घेऊ लागला. विमलचे आहेर प्रेमप्रकरण सुरु असल्याच्या संशयाचे भूत त्याच्या मानगुटीवर बसले. यातूनच त्यांच्यात दररोज खटके उडत होते. रविवारी (दि.१३) दुपारी त्याचा पत्नी विमलसोबत वाद घातला. यातूनच मारोतीने विमलच्या गुप्तांगावर चाकूने वार केले. विमलला रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, उपचार सुरू असताना रात्री अडीचच्या सुमारास तिचा मृत्यू झाला.

  या प्रकरणी विमलची आई जयवंतीबाई मसराम (रा. कुऱ्हा) यांनी आर्णी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा नोंद करून मारोती आरके याला पोलिसानी अटक केली आहे.